Paris Olympics 2024 : सुवर्णपदकाच्या दिशेने भारत वाटचाल करेल – भरत छेत्री

Paris Olympics 2024 (Hockey India) :- आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा पुरुष हाॅकी संघ नक्कीच सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल करेल. हाॅकी इंडिया ही संघटना खरोखरच तळागाळातील ड्रॅग-फ्लिकर्स आणि गोलकीपर्सचे पालनपोषण करण्यावर भर देत असून देशाच्या खेड्यापाड्यातून नवनवे खेळाडू शोधून काढत आहे, असे प्रतिपादन भारताचा माजी गोलकीपर भरत छेत्री याने केले आहे.
छेत्रीसह भारताचे माजी गोलकीपर आणि ड्रॅग-फ्लिकर्स यांची देशभरातील राष्ट्रीय अकादमींमध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षकांमध्ये एड्रियन डिसोझा, योगिता बाली, हेलन मेरी, दीपिका मूर्ती, आकाश चिकटे आणि पीटी राव यांचा समावेश आहे. तर ड्रॅग-फ्लिकर्समध्ये रुपिंदर पाल सिंग, गुरजिंदर सिंग, व्हीआर रघुनाथ आणि जसप्रीत कौर यांचा समावेश आहे.
Paris Olympics 2024 : पुरुष हाॅकी संघ सुवर्णपदक नक्की जिंकेल – प्रीतमराणी सिवाच
भारतीय हॉकीच्या भवितव्यासाठी तळागाळातील विकासासाठी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. गोलकीपर आणि ड्रॅग-फ्लिकर्ससाठी विशेष प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करून, हॉकी इंडिया या महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये जागतिक दर्जाच्या प्रतिभेच्या उदयासाठी एक भक्कम पाया रचत आहे, असे छेत्रीने म्हटले असून आपण या उपक्रमाचा एक भाग असल्याचामला सन्मान वाटतो. त्यामुळेच मला विश्वास आहे की यामुळे खेळासाठी उल्लेखनीय परिणाम मिळतील.





