Indian Hockey Team Prize Money : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले आहे. संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. आता ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी टीम इंडियाला बक्षिसरूपी रक्कम देण्याची घोषणा केली आहे. पण भारतीय संघाचा बचावपटू अमित रोहिदासला ओडिशा सरकारकडून सर्वाधिक रक्कम मिळणार आहे. अमित रोहिदास याला लाखात नाही तर कोटीत रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे.
अमित रोहिदासला 4 कोटी…
बक्षीसाची रक्कम जाहीर करताना ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले की, ओडिशातून आलेल्या भारतीय संघाचा बचावपटू अमित रोहिदास याला 4 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. संघातील प्रत्येक उर्वरित खेळाडूला 15 लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 10 लाख रुपये दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
#WATCH भुवनेश्वर: ओडिशा के मुख्यमंत्री मोहन चरण माझी ने भारतीय पुरुष हॉकी टीम के पेरिस 2024 ओलंपिक में कांस्य पदक जीतने पर कहा, “भारतीय हॉकी टीम ने स्पेन को हराकर पेरिस ओलंपिक में कांस्य पदक जीता है, इस उपलब्धि को आने वाली पीढ़ियां याद रखेंगी। मैं सभी खिलाड़ियों को बधाई देता हूं।… pic.twitter.com/v7gM0KhK1q
— ANI_HindiNews (@AHindinews) August 8, 2024
रेड कार्ड मिळाल्याने आला होता चर्चेत..
अमित रोहिदास हा तोच खेळाडू आहे ज्याला पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रेड कार्ड दाखवण्यात आले होते. वास्तविक, उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना ग्रेट ब्रिटनशी झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू असताना बॉल मारण्याच्या प्रयत्नात अमित रोहिदासच्या हॉकी स्टिकचा मागचा भाग ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूच्या चेहऱ्याला लागला. याच आधारावर अमितला संपूर्ण सामन्यातून आणि त्यानंतरच्या एका सामन्यातून बाहेर बसावे लागले होते.
Paris Olympics 2024 (Hockey) : हाॅकीमध्ये टीम इंडियाची कांस्य भरारी…
अमित रोहिदासचा जन्म ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यात झाला आणि तो 2013 पासून भारतीय वरिष्ठ हॉकी संघासाठी बचावपटू म्हणून खेळत आहे. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अमित देखील एक भाग होता. अमित हा पेशाने डिफेंडर आहे, पण त्याने त्याच्या कारकिर्दीत 184 सामने खेळताना 28 गोलही केले आहेत.