Hockey Asia Cup 2025 : भारताने आशिया कप जिंकत रचला इतिहास! पाकिस्तानला मागे टाकत विश्वचषकासाठी ठरला पात्र

Indian team wins Hockey Asia Cup 2025 title : हॉकी आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने दक्षिण कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवत जेतेपद पटकावले. या विजयासह भारताने 2026 मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठीही पात्रता मिळवली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अपराजित राहत दमदार कामगिरी केली आणि अंतिम सामन्यात कोरियन संघाला एकतर्फी पराभूत केले.
सुखजीतने केली धमाकेदार सुरुवात –
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ दाखवला. अवघ्या काही सेकंदातच सुखजीत सिंगने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळत गोलवर नियंत्रण ठेवत कोरियन संघावर दबाव कायम राखला. जुगराज सिंगलाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळाली, पण त्याने ती संधी गमावली.
दिलप्रीतने आघाडी केली दुप्पट –
Dominance till the very end!🔥
India beat Korea 4–1 in the Final to be crowned 𝗖𝗵𝗮𝗺𝗽𝗶𝗼𝗻𝘀 of the Hero Asia Cup Rajgir, Bihar 2025.#HockeyIndia #IndiaKaGame #HumseHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/yZQbynjxDt
— Hockey India (@TheHockeyIndia) September 7, 2025
दुसऱ्या सत्रात दिलप्रीत सिंगने 27व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी दुप्पट केली. या गोलमुळे भारतीय संघाचा उत्साह वाढला आणि त्यांनी आक्रमक खेळ कायम ठेवला. दक्षिण कोरियानेही गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही.
हेही वाचा – Duleep Trophy 2025 : महाराष्ट्राच्या सौरभ नवलेने रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
10 खेळाडूंसह खेळताना भारताने मारली बाजी –
𝗖𝗵𝗮𝗺𝗽𝗶𝗼𝗻𝘀 𝗼𝗳 𝗔𝘀𝗶𝗮! 🏆🇮🇳🔥
India reign supreme at the Hero Asia Cup Rajgir, Bihar 2025 with a stellar campaign to lift the crown — their fourth Asia Cup title. 👑#HockeyIndia #IndiaKaGame #HumseHaiHockey #HeroAsiaCupRajgir pic.twitter.com/AOfD8wbB2K
— Hockey India (@TheHockeyIndia) September 7, 2025
तिसऱ्या सत्रात भारतीय खेळाडू संजयला ग्रीन कार्ड मिळाल्याने भारताला 10 खेळाडूंसह खेळावे लागले. तरीही, या सत्राच्या शेवटी दिलप्रीत सिंगने आपला दुसरा गोल करत भारताची आघाडी 3-0 अशी वाढवली. चौथ्या सत्रात अमित रोहिदासने 49व्या मिनिटाला गोल करत भारताला 4-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यावेळी दक्षिण कोरियाचे खेळाडू थकलेले दिसत होते आणि त्यांना फारशी संधी मिळाली नाही. 50व्या मिनिटाला सोन दियानने कोरियासाठी एकमेव गोल केला. अखेरीस भारताने 4-1 असा विजय मिळवत आशिया कपच्या ट्रॉफीवर नाव कोरले.
हेही वाचा – BCCI Financial Growth : बीसीसीआयच्या कमाईत प्रचंड वाढ; अवघ्या पाच वर्षांत कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा
भारताने पाकिस्तानला टाकले मागे –
भारताने हॉकी आशिया कपचा किताब चौथ्यांदा जिंकला आहे. यापूर्वी भारताने 2003, 2007 आणि 2017 मध्ये हा किताब पटकावला होता. या विजयाने भारताने पाकिस्तानला मागे टाकले, ज्याने 1982, 1985 आणि 1989 मध्ये तीन वेळा हा किताब जिंकला होता. भारतीय संघाच्या या दमदार कामगिरीमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता सर्वांचे लक्ष 2026 च्या हॉकी विश्वचषकावर आहे, जिथे भारतीय संघ पुन्हा एकदा आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे.





