Paris Olympics 2024 (Badminton) : लक्ष्य सेनचे कौतुक करणाऱ्या खेळाडूने जिंकलं सुवर्णपदक…

Paris Olympics 2024 (Badminton) : बॅडमिंटन पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसेनने थायलंडच्या कुनलावुत विटिसारनचा 21-11, 21-11 असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक विजेतेपद म्हणजेच सुवर्णपदक पटकावले आहे. हा तोच व्हिक्टर एक्सेलसेन आहे, ज्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनवर विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूचे कौतुक केले होते.
GOLD! 🥇
Denmark’s Viktor Axelsen defends his Tokyo #gold medal in Paris, finishing top of the podium again in badminton men’s singles. 🇩🇰@DIFidraet | @bwfmedia | #Badminton | #Paris2024 | #Samsung | #TogetherforTomorrow pic.twitter.com/4se2s54X37
— The Olympic Games (@Olympics) August 5, 2024
“लक्ष्य सेन हा बॅडमिंटन जगतातील एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याने मला विजयासाठी चांगलेच झुंजवले. त्याचे भवितव्य फारच उज्ज्वल असून तो भारतासाठी भविष्यात नक्कीच सुवर्ण जिंकेल “, असा विश्वास व्हिक्टर अॅलेक्ससनने बोलून दाखवत लक्ष्यच्या खेळाचे मनापासून कौतुक केले होते.
दरम्यान, दुसरीकडे आज भारताच्या लक्ष्य सेनला बॅडमिंटन एकेरीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. लक्ष्य सेनने पहिला गेम सहज जिंकला होता, पण मलेशियाच्या ली जी जियाने दुसरा आणि तिसरा गेम जिंकून भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का दिला. मलेशियाच्या ली जी जियाने लक्ष्यचा 13-21, 21-16 आणि 21-11 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले.





