परिणीती चोप्राची नवी इनिंग सुरु; व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

Parineeti Chopra | बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या ‘इशकजादे’ या सिनेमामुळे परिणीती प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटामुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली. परिणीती अभिनेत्रीसह एक उत्तम गायिका देखील आहे.
आता तिने नवी सुरुवात केली आहे. परिणीतीने स्वत:चे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. ज्याद्वारे ती चाहत्यांना तिच्या दैनंदिन जीवनाची झलक दाखवणार आहे. याबाबत परिणीती चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती म्हणते की, “मी सेलिब्रिटी असले तरी पहिल्यापासूनच माझं आयुष्य प्रायव्हेट ठेवलेलं आहे. माझ्या पर्सनल लाइफबाबत मी केवळ १ टक्केच माहिती सोशल मीडियावर शेअर करते. मी माझ्या आयुष्यात खूप काही करत आहे. मी स्कूबा डायव्हिंग करते, मी वाचते आणि गातही असते.”
View this post on Instagram
पुढे ती म्हणते की, “माझ्या आयुष्यात सध्या इतक्या काही गोष्टी घडत आहेत. मला वाटतं की हे माझ्या चाहत्यांबरोबर शेअर करावं. आणि आता यासाठी मी तयार आहे. म्हणूनच मी युट्यूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मी यासाठी खूप उत्सुक आहे. कारण आता मी दिवसभरात मी जे काही करेन ते तुमच्यासोबत शेअर करेन. लवकरच भेटुया…” तिच्या पहिल्या व्हिडिओला काही तासांतच हजारोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.
परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची’चमकिला’ चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासोबत दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत होता.
हेही वाचा:





