परिणीती चोप्राने दिली गुड न्यूज; लवकरच होणार नव्या पाहुण्याचे आगमन

Parineeti Chopra Pregnancy | अभिनेत्री परिणीती चोप्राने गुड न्यूज दिली आहे. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांनी अत्यंत खास पद्धतीने राजस्थानमध्ये लग्न केले. लग्नानंतर परिणिती गूडन्यूज कधी देणार? अशी विचारणा देखील अनेकदा केली जात होती. अखेर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लवकरच आई-बाबा होणार आहेत. परिणीतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे.
परिणीतीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये चिमुकल्याच्या पायांचे ठसे दिसत आहेत. एक केक आणि त्याच्यावर १+१=३ असं लिहिलं आहे. तसेच व्हिडिओमध्ये परिणीती आणि राघव चालताना दिसत आहेत. या पोस्टला तिने, ”आमचे छोटेसे जग… त्याच्या मार्गावर” असे कॅप्शन दिले आहे. परिणीतीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. चाहत्यासह अनेक कलाकरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. Parineeti Chopra Pregnancy |
View this post on Instagram
राघव यांच्या उत्तराने परिणीती झाली होती शॉक
अलीकडेच ही जोडी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक मजेशीर गोष्टी शेअर केल्या. या दोघांना कपिल शर्माने बेबी प्लॅनिंग करणार आहात का? असा सवाल केला होता. त्यावर राघव म्हणाले की, “देऊ… तुम्हा सर्वांना लवकरच आम्ही आनंदाची बातमी देऊ” हे उत्तर ऐकताच परिणीती थोडी शॉक झाली. ती आश्चर्याने राघव यांच्याकडे पाहत हसू लागली. Parineeti Chopra Pregnancy |
परिणीती चोप्रा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचं २०२३ रोजी राघव चड्ढा यांच्याशी लग्न झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी खास पध्दतीने उदयपूरमध्ये विवाह करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दोन वर्षानंतर आता दोघांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. Parineeti Chopra Pregnancy |
हेही वाचा:
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या आगमनासाठी बनवा भाज्यांपासून खास गोडधोड पदार्थ…





