परिणीती चोप्रा झाली आई; दिवाळीच्या मुहूर्तावर गोंडस बाळाचे आगमन

Parineeti Chopra | अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते, राज्यसभा खासदार राघव चड्ढा आई-बाबा झाले आहेत. परिणीतीने १९ ऑक्टोबर रोजी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. परिणीती आणि राघव चड्ढा यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
“याआधीच आयुष्य आम्हाला आठवत नाही. पहिलं आम्ही एकमेकांसाठी होतो. आता आमच्याकडे सगळं काही आहे”, असं परिणीती आणि राघव यांनी पोस्ट शेअर करत म्हंटले. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. Parineeti Chopra |
View this post on Instagram
दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २०२३मध्ये लग्नगाठ बांधली होती. उदयपूरमध्ये यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. तर अलीकडेच ऑगस्ट महिन्यात परिणीतीने गरोदर असल्याचं सांगितलं होतं. आता लग्नानंतर दोन वर्षांनी ते आई-बाबा झाले आहेत. Parineeti Chopra |
हेही वाचा:





