Parbhani Accident: देवदर्शनाहून परतताना पोलिस कर्मचाऱ्याच्या गाडीला अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू, मुले जखमी

परभणी – परभणीतील जिंतूर-परभणी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी शहरातील दत्तनगर परिसरातील पोलीस कर्मचारी नवनाथ मुंढे हे आपल्या कुटूंबियासह शिर्डीला गेले होते.
शिर्डीत दर्शन घेवून परभणीला परतताना जिंतूर-परभणी रस्त्यावरील कोक गावाजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जावून उलटली. यात कारचा चक्काचुर झाली. यात संगिता मुंढे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नवनाथ मुंढे (५३), मुलगा शुभम मुंढे (२२), मुलगी भगवती मुंढे हे तिघे जखमी झाले.
दरम्यान घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ जखमींना परभणी येथील देवगिरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलीस कर्मचारी नवनाथ मुंढे यांची प्रकृती नाजुक असून मुलगा व मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान या प्रकरणी ग्रामीण पोलिीस ठाण्यात भगवती मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास पोलिस निरिक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विक्रम हराळे, बीट जमादार शंकर हाके हे अधिक तपास करीत आहेत.





