Farmer News : शेतकऱ्याने 10 एकर सोयाबीनवर फिरवला नांगर; पाऊस नसल्याने हातातोंडाशी आलेला घास गेला वाया
Farmer News : पावसाने मारलेल्या मोठ्या खंडामुळे राज्यातील खरीपाची पिके करपू लागली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

Farmer News : पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाची पिके धोक्यात आली असून, राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. काही ठिकाणी खरीपाची पिके करपली आहेत. अशीच स्थितीत परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील मंगलबाई दत्तराव हिक्के या शेतकऱ्याने 10 एकर सोयाबीनवर नांगर फिरवला आहे. पावसाअभावी सोयाबीन वाळून गेल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतला. (Farmer News)
परभणी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेले सोयाबीन पीक वाळून चालले आहे. त्यामुळे उत्पादनाची आशा मावळलेल्या एका शेतकऱ्याने तब्बल 10 एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर नांगर फिरवला. (Farmer News)
हिक्के यांनी मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून आपल्या शेतात सोयाबीनची लागवड केली होती. मात्र पीक वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारली. परिणामी पिकाला आवश्यक ओलावा मिळाला नाही आणि सोयाबीन वाळू लागले. (Farmer News)
पिकाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याने शेतकऱ्यासमोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पीक वाचण्याची शक्यता कमी झाल्याने अखेर नाईलाजाने त्यांनी सोयाबीनवर नांगर फिरवण्याचा निर्णय घेतला. (Farmer News)
एका बाजूला लागवडीसाठी झालेला खर्च आणि दुसऱ्या बाजूला हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (Farmer News)
Farmer News : मराठवाड्यात फक्त २४.५५ लाख हेक्टर पेरणी; लागवड क्षेत्रात १७.८७ लाख हेक्टरची घट






