satara | परशुराम जन्मोत्सव सोहळा दादा महाराज मठात उत्साहात

फलटण, (प्रतिनिधी) – येथील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्रातर्फे दादा महाराज मठ ब्राह्मण गल्ली येथे श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रारंभी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य नंदकुमार केसकर व पदाधिकारी यांनी भगवान परशुरामाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थितांनी जय परशुराम, जय श्रीराम यांच्या घोषणेने परिसर दणाणून सोडला.
नंदकुमार केसकर म्हणाले, यावर्षी सार्वजनिक मुंजीच्या कार्यक्रम नियोजन पद्धतीने पार पडला. तसेच यावेळी कराड, कोरेगाव, कुर्डूवाडी व फलटण इथून नऊ मुंजी आल्या. यावेळीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व बटूंची दिमाखदार मिळून मिरवणूक पार पडली.
श्री भगवान परशुराम यांच्या कार्याची माहिती डॉ. श्रीपाद चिटणीसांनी दिली. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वानंद चिटणीस, चंद्रशेखर दाणी, डॉ. माधुरी दाणी, एड. विजयराव कुलकर्णी यांनी सूचना मांडल्या. सचिन कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. निखील केसकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमात संघटनांचे सर्व सभासद बंधू-भगिनी उपस्थित होते.





