ऑलिम्पिकपदक विजेत्या निरजला परम विशिष्ट सेवा पदक
Updated On:

नवी दिल्ली – जपानमध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा 4 राजपुताना रायफल्सचा सुभेदार व देशाचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा याला परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने सैन्य दलांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली त्यात निरजचाही गौरव केला आहे.
गेल्यावर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या राजपुताना रायफल्सचा सुभेदार नीरज चोप्रा याच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.





