Para Badminton World C’ships 2024 : प्रमोद भगतचे ऐतिहासिक कामगिरीसह सुवर्ण…

Para Badminton World C’ships 2024 – भारताचा अनुभवी पॅरा बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगत याने थायलंड येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने एसएल थ्री प्रकारात इंग्लंडच्या डॅनियल बेथेल याला पराभूत करीत सुवर्णपदकाची कमाई केली. प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील हे त्याचे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले.
प्रमोद भगत याने याप्रसंगी बॅडमिंटन या खेळातील महान खेळाडू लिन डॅन याच्याही विक्रमाची बरोबरी केली. पाच जागतिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणारा प्रमोद भगत हा लिन डॅन याच्यानंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे. लिन डॅन याने २००६, २००७, २००९, २०११, २०१३ या वर्षांमधील स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली होती.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/most-sixes-in-test-rohit-sharma-equals-viv-richards/
प्रमोद भगत याने २०१३, २०१५, २०१९, २०२२ व २०२४ या वर्षांमध्ये सुवर्णपदक पटकावताना देदीप्यमान कामगिरी केली. प्रमोद भगत याने या स्पर्धेमध्ये एकेरीसह दुहेरीतही दोन पदके जिंकली आहेत. पुरुषांच्या दुहेरीत त्याने सुकांत कदमच्या साथीने ब्राँझपदकाला गवसणी घातली. तसेच मिश्र दुहेरीत मनीषा रामदास याच्या साथीने आणखी एक ब्राँझपदक पटकावण्यात त्याला यश मिळाले.





