‘रायबरेलीचा खासदार देशाचा पंतप्रधान होणार’ ; पप्पू यादव यांचा दावा

Pappu Yadav In Raebareli । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्याच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान. या चौथ्या टप्प्यात रायबरेली मतदारसंघाचा समावेश आहे. त्यासाठी बिहारचे काँग्रेस नेते पप्पू यादव उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे पोहोचलेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी ते प्रचार करणार आहेत.
पप्पू यादव रायबरेलीत प्रचार करणार Pappu Yadav In Raebareli ।
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यात पप्पू यादव काँग्रेसच्या निवडणूक प्रचारातही जोरदार सक्रिय आहेत. पप्पू यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये, “मी रायबरेलीला आलो आहे, 44 वर्षांनंतर रायबरेलीचा खासदार देशाचा पंतप्रधान होणार आहे. प्रचंड उत्साह आहे. राहुल गांधी पाच लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजयी होणार! सर्व विक्रम मोडले तर आश्चर्य वाटणार नाही!”असे म्हटले आहे.
राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक रिंगणात Pappu Yadav In Raebareli ।
राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते भाजपकडून दिनेश प्रताप सिंह यांच्या विरोधात उभे आहेत. यापूर्वी ते अमेठीतूनही निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा होती, मात्र अमेठीची जागा काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा यांना देण्यात आली. राहुल गांधी हे वायनाडमधूनही उमेदवार आहेत.
राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांची आई सोनिया गांधी या जागेवरून नेहमीच निवडणूक लढवत होत्या, मात्र त्या राज्यसभेवर गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. रायबरेलीमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
हेही वाचा
“काँग्रेस पक्षानंही अनेक चुका केल्या त्यात आता…” ; राहुल गांधींचं धक्कादायक विधान





