Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेतील भारतीय राजदुतांना पन्नूची धमकी

वॉशिंग्टन : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. व्हिडीओ जारी करताना पन्नूने अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांच्याबाबत विष ओकले असून रशियालाही धमकी दिली आहे. खलिस्तानींच्या विरोधात मोहीम राबवण्यासाठी भारताला रशियाकडून मदत मिळत आहे. रशियाने भारताला खलिस्तानींची गुप्तचर माहिती दिली आहे.
अशा परिस्थितीत त्यांची संघटना रशियन मोहिमांनाही लक्ष्य करेल अशी धमकी त्याने दिली आहे. रशिया आणि भारतीय राजनयिक विनय क्वात्रा यांना धडा शिकवला जाईल, असा व्हिडिओ स्पुतनिकने जारी केला आहे रशियाने खलिस्तानी दहशतवादी कारवायांची गुप्तचर माहिती भारताला देण्यास सुरुवात केली असल्याचा दावा पन्नूने केला.
रशियाला असे करण्यापासून रोखण्यासाठी खलिस्तानी उत्तर अमेरिका, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील मॉस्कोच्या मिशनवर हल्ला करतील, असे पन्नूने म्हटले आहे. क्वात्रा हे वॉशिंग्टनमध्ये आहेत आणि रशियन मुत्सद्दी आणि वाणिज्य दूतांशी समन्वय साधतात. त्यांना रशियन एजन्सींकडून खलिस्तान समर्थक शिखांची माहिती मिळत आहे. या माहितीच्या आधारे शीखांना लक्ष्य केले जात आहे.विनय मोहन क्वात्रा आधीच खलिस्तानींच्या रडारवर आहे, ते भारत-रशिया युतीचा चेहरा बनत आहे असेही त्याने म्हटले आहे.





