Pankaja Munde । पंकजा मुंडे भरसभेत अमित शाहसमोर बोलून गेल्या,’पडदा गिर चुका है…’

Pankaja Munde । देशाचे गृहमंत्री अमित शहा आज जळगाव दौऱ्यावर आले होते. अमित शाह मागील दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाह यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. अमित शाह संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर होते, यादरम्यान स्टेजवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे असे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी एक वाक्य म्हटलं. अमित शाह स्टेजवर असतानाच ते वाक्य त्या बोलून गेल्या. ज्याची चर्चा आता रंगली आहे.
Pankaja Munde । नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे
‘आज अमित शाह यांचं छत्रपती संभाजी नगरमध्ये येणं हे अजून ताकदीने मैदानात उतरण्यासाठीचं द्योतक आहे असं म्हणायला हरकत नाही. मी फार वेळ इथे घेणार नाही. पण एक सांगते, जिंदगी के रंगमंच पर कुछ इस तरह निभाया अपना किरदार, परदा गिर चुका है तालियाँ फिर भी गुंज रही है असं काम ज्यांनी केलं त्या माझ्या पित्याच्या चरणी नतमस्तक होऊन इतकंच सांगते.
या देशाला जेव्हा सर्वात जास्त गरज होती की, गरिबांच्या स्वप्नांना ठिगळ लावण्याची, एका गरिबाला खुल्या आसमानातून स्वत:च्या पक्क्या घरामध्ये पोहोचवण्याची, माता-बहिणीच्या डोळ्यातलं पाणी नळामध्ये आणण्याचं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाला लाभले आहे.’ असं म्हणत छत्रपती संभाजी नगरच्या सभेत पंकजा मुंडे यांनी मोदी सरकारच्या विविध कामांचं, योजनांचं कौतुक केल.
हेही वाचा
‘शिंदे गटाचा पत्ता कट’छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाला मिळणार तिकीट ?





