Bhagwan Gad Dussera Melava : “कई दिनों से हवा जरा तेज चल रही है…” भगवान गडावर मुंडे बंधू-भगिनींची शायरीतून टोलेबाजी
Bhagwan Gad Dussera Melava : पवित्र भगवान गडावर पार पडलेल्या यंदाच्या पारंपारिक विजयादशमी दसरा मेळाव्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू, संघर्षाचा निर्धार आणि राजकीय विरोधकांना शायरीतून दिलेली धारदार उत्तरे यांचीच राज्यभरात चर्चा रंगली.

Bhagwan Gad Dussera Melava : भगवान गडावरील विजयादशमी मेळाव्यात यंदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न आणि राजकीय शेर-ओ-शायरीची चांगलीच चर्चा रंगली. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणांतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या टीका-टिप्पणीला शायरीतून उत्तर दिल्याने त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली. (Bhagwan Gad Dussera Melava)
“जलता चिराग मेरा, हवा मचल रही है…”
गेल्या अडीच वर्षांपासून अनेक विषयांवर आपण शांत राहिल्याचे धनंजय मुंडे यांनी भाषणात सांगितले. प्रत्येक टीकेला उत्तर देण्याऐवजी शांत राहणे पसंत केल्याचे नमूद करत त्यांनी आपल्या भावना काव्यपंक्तींतून व्यक्त केल्या. Bhagwan Gad Dussera Melava)
“कभी कभी खामोशी भी लफ़्ज़ों के ताक़त से बड़ी होती है,” असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. त्यानंतर त्यांनी शायर राहत इंदोरी यांच्या नावाने प्रचलित असलेल्या शेरचा उल्लेख केला. (Bhagwan Gad Dussera Melava)
“जलता चिराग मेरा, हवा मचल रही है,
कई दिनों से हवा ज़रा तेज चल रही है…”
पुढे त्यांनी विरोधकांना उद्देशून, “कुछ महफ़िलें ऐसी बैठी हैं मेरी तबाही के लिए, उन्हें मालूम ही नहीं हवा रुख बदल रही है,” असे म्हणत राजकीय टोलेबाजी केली. त्यांच्या या काव्यमय वक्तव्याला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. (Bhagwan Gad Dussera Melava)
पंकजा मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द
दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. स्वतःचे जीवन सुखात जात असले, तरी जनतेच्या वाट्याला दुःख आले तर आपणही त्यात सहभागी होऊ, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. (Bhagwan Gad Dussera Melava)
“जिंदगी में तपिश भी बहुत जरूरी है, क्योंकि अक्सर वे पौधे मुरझा जाते हैं जिनकी परवरिश हमेशा छांव में होती है,” या शायरीतून त्यांनी संघर्षाचे महत्त्व अधोरेखित केले. (Bhagwan Gad Dussera Melava)
याशिवाय, जात-पात करून कोणताही नेता मोठा होत नाही, असे सांगत त्यांनी सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. अडचणीच्या काळातही खचून न जाता संघर्ष करत राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. (Bhagwan Gad Dussera Melava)
“तुम्ही माझ्या आस्मानातले तारे आहात!”
पंकजा मुंडे यांनी आणखी एका काव्यपंक्तीतून कार्यकर्त्यांना धीर दिला.
“चलते रहेंगे काफ़िले मेरे, बग़ैर मेरे भी यहाँ,
एक सितारा टूटने से, फ़लक सूना नहीं होता।”
“तुम्ही माझ्या आस्मानातले तारे आहात. सदैव चमकत राहा आणि धीर धरा, मी तुमच्या पाठीशीच आहे,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांशी भावनिक संवाद साधला. (Bhagwan Gad Dussera Melava)
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा
यंदाच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना मुंडे बंधू-भगिनींच्या भाषणांत शेतकऱ्यांचे प्रश्न, संघर्ष आणि राजकीय परिस्थिती हे मुद्दे ठळकपणे समोर आले. धनंजय मुंडे यांच्या शायरीतून झालेल्या टोलेबाजीची आणि पंकजा मुंडे यांच्या भावनिक आवाहनाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे. (Bhagwan Gad Dussera Melava)



