Pankaja Munde । Vidhan Parishad Result – विधानपरिषदेच्या निवडणुका आज घेण्यात आल्या. विधानसभेच्या सर्वच्या सर्व २७४ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. सायंकाळी ५ वाजता मतदान मोजणीस सुरुवात झाली असून सुरुवातीचे दोन्ही निकाल भाजपसाठी गोड ठरले आहेत. भाजप उमेदवार योगेश टिळेकर व पंकजा मुंडे यांनी विजयासाठी आवश्यक असलेला २३ मतांचा कोटा पार केल्याने या दोघांचाही या निवडणुकीत विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर भाजपने त्यांना पुन्हा एकदा संधी देत विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. यामध्ये त्यांचा विजय झाल्याने निश्चितच ही पंकजा मुंडे यांच्या समर्थकांसाठी दिलासादायक बातमी ठरली आहे. दरम्यान, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजप नेत्या पंकज मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या की, “मला आनंद वाटत आहे. मी पक्षासाठी अधिक जोमाने काम करेन असे त्या म्हणाल्या. माझ्या विजयाचा आनंद लोकांना झालाय याचा फार आनंद आहे. जिथे जास्त योगदान देऊ शकेन तिथं चांगलं काम करेन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. लोकांच्या चेहऱ्यांकडून पाहून आनंद वाटतोय, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. तत्पूर्वी, २०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षामध्ये पंकजा मुंडे यांना साईड लाईन केले जात असल्याच्या चर्चा सातत्याने सुरु होत्या. पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या मनातील खदखद अनेकदा जाहीररीत्या बोलून दाखवली होती. लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना त्यांच्याच भगिनी प्रीतम मुंडे यांना खाली बसवून संधी देण्यात आली होती. मात्र लोकसभेतही त्यांचा पराभव झाला होता. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेवर संधी दिल्याचं बोललं जात आहे. ‘आम्हाला पाच मतं अधिक मिळाली…’ – उपमुख्यमंत्री अजित पवार निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, ते म्हणाले, ‘विधानपरिषद निवडणुकीत आमच्याकडे ४२ मतं होती. आम्हाला ४७ मतं मिळाली आहेत. आम्हाला अधिकची ५ मतं मिळाली. त्यांचे आभार मानतो, असं अजित पवार म्हणाले. महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले आहेत. महायुती विधानसभा निवडणुकीत देखील अशाच रणनीतीनुसार विजय मिळवणार असल्याचं अजित पवार म्हणाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. सुनिल तटकरे म्हणतात, उंबरठा ओलांडून आम्ही चार पावलं पुढे गेलो ! सुनिल तटकरे म्हणतात, “उंबरठा ओलांडून आम्ही चार पावलं पुढे गेलो.” त्यांच्या मते, अनेक अदृश्य शक्ती आहेत ज्या पुढच्या काळात त्यांना मदत करतील. आमदारांचा अभिमान व्यक्त आहे आणि आणखी मिळालेल्या मतांचे आभार मानले. एकनाथ शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार विजयी – एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भावना गवळी २४ मतं मिळवत विजयी झाल्या आहेत. तर दुसरे उमेदवार कृपाल तुमाने विजयी झाले आहेत. त्यांना २५ मतं मिळाली आहेत.