Actor Pankaj Tripathi: अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी ‘मिर्झापूर’ सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच त्यांना साधे जीवन जगण्यासाठीही ओळखले जाते. वैयक्तिक जीवनात देखील ते जमिनीशी जोडलेले असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच, पंकज त्रिपाठी व त्यांच्या पत्नी मृदुला यांनी लग्नाचा 21वा वाढदिवस साजरा केला.
पंकज त्रिपाठी व मृदुला यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने कुटुंबातील सदस्यांसाठी खास पार्टीचे देखील आयोजन केले होते. या निमित्ताने त्यांचे कुटुंबातील सदस्य व जवळचे नातेवाईक उपस्थित होते. लग्नाचा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो मृदुला यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
लग्नाचा वाढदिवस साजरा करतानाचा मजेशीर व्हीडिओ मृदुला यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी हे पत्नीला अंगठी घालतात व त्यानंतर त्यांच्यासमोर हात जोडून नतमस्तक होतात. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांकडूनही त्यांना कमेंट्सच्या माध्यमातून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, पंकज त्रिपाठी आणि मृदुला यांचा प्रेमविवाह आहे. त्यांनी 15 जानेवारी 2004 ला लग्न केले होते. पंकज त्रिपाठी 11वीत असताना व मृदुला 9वीत शकत असताना दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना पाहिले होते. नंतर या प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले.
पंकज त्रिपाठी यांच्या कामाबद्दल सांगायचे तर ते शेवटचे ‘स्त्री-2’ चित्रपटात दिसले होते. लवकरच ते ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.