Panchgani News : स्वच्छतेचा ‘पाचगणी पॅटर्न’ देशात अव्वल! ‘सुपर स्वच्छता लीग’मध्ये देशात प्रथम क्रमांक; पटकावला राष्ट्रपती पुरस्कार
Panchgani News : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि निसर्गसौंदर्याने नटलेले जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ पाचगणी आता केवळ पर्यटनासाठीच नाही, तर स्वच्छतेच्या बाबतीतही संपूर्ण देशासाठी दीपस्तंभ ठरले आहे.

Panchgani News : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि आपल्या निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ घालणारे पांचगणी शहर आता केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर स्वच्छतेच्या बाबतीतही संपूर्ण देशासाठी एक दीपस्तंभ ठरले आहे. (Panchgani News)
केंद्र सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ अंतर्गत यंदा प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘सुपर स्वच्छता लीग’मध्ये २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटात पांचगणी नगरपरिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. (Panchgani News)
या अभूतपूर्व कामगिरीबद्दल महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज, बुधवारी (११ नोव्हेंबर) नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पाचगणी नगरपरिषदेचा विशेष सन्मान झाला. (Panchgani News)
कठीण निकष, पण जिद्दीने मारली बाजी!
मागील सलग चार वर्षे (२०२० ते २०२४) स्वच्छतेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक शहरांसाठी केंद्र शासनाने यंदा ‘सुपर स्वच्छता लीग’ ही स्पर्धा सुरू केली होती. या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणांची कडक अट होती. दररोज हजारो पर्यटकांची वर्दळ असतानाही पाचगणीने या आव्हानाचे सोने केले. (Panchgani News)
८५% पेक्षा जास्त गुण: कडक निकषांना पार करत पाचगणीने देशात सर्वोच्च गुण मिळवले. कचरा व्यवस्थापनाचा वस्तुपाठ: ओला व सुका कचरा १००% वेगळा करणे, त्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे आणि शहर सुशोभीकरण यावर दिलेला भर संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरला आहे. (Panchgani News)
सामूहिक प्रयत्नांना मिळालेली पोचपावती
हा राष्ट्रीय बहुमान म्हणजे केवळ एक पुरस्कार नसून पाचगणीच्या दूरदृष्टीचे आणि शिस्तीचे फलित आहे. नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे, घाटजाई विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी पंडित पाटील आणि नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे नियोजन या यशाच्या पाठीशी आहे. (Panchgani News)
त्याचप्रमाणे, ऊन-पावसाची तमा न बाळगता राबणारे सफाई कर्मचारी आणि स्वच्छतेची सवय अंगी बाळगणारे पाचगणीचे नागरिक यांच्या अखंड कष्टांमुळे महाबळेश्वर-पांचगणी परिसराच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. (Panchgani News)
”पाचगणी हे निसर्गाने नटलेले समृद्ध शहर आहे. निसर्गाने दिलेला हा स्वच्छतेचा आरसा अधिक पारदर्शक ठेवण्याचे कार्य मी मनापासून केले आहे आणि हा स्वच्छतेचा वारसा असाच अविरत पुढे चालू राहील.”
– पंडित पाटील (मुख्याधिकारी, पाचगणी नगरपरिषद)





