पल्लवी जोशी नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; अनुपम खेर यांच्या चित्रपटात करणार काम

Pallavi Joshi | अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अलीकडेच तिने ‘काश्मीर फाईल्स’, ‘द व्हॅक्सिन वॉर’सारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करत अनेकांची मनं जिंकली. यानंतर आता पल्लवी आणखी एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. पल्लवी जोशी आगामी चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मिडिया हँडलवरून पल्लवी जोशी यांचा कॅरेक्टर पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकेबाबत सांगितले आहे. विद्या रैना असं तिच्या भूमिकेचं नाव आहे. तिच्या लूकवरून ती तन्वीच्या आईची भूमिका साकारत आहे असा अंदाज आहे.
View this post on Instagram
अनुपम खेर यांनी केले पल्लवी जोशी यांचे कौतुक
अनुपम खेर यांनी एक लांबलचक पोस्ट लिहून पल्लवी जोशीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “मी पल्लवी जोशीचा चाहता आहे. ती खऱ्या अर्थाने टीव्हीची ज्योत आहेत. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणे ही आपल्या इंडस्ट्रीसाठी भेटच आहे. ती अतिशय निवडकपणे अभिनय करते, पण जेव्हा ती पडद्यावर असते, तेव्हा 100 टक्के निश्चित असते की राष्ट्रीय पुरस्कार येणार आहे. तिच्या भावनांच्या रेंजला कोणतीही मर्यादा नाही.”
अनुपम खेर पुढे म्हणाले, “तन्वी द ग्रेटमधील त्यांचे पात्र दया, बलिदान आणि शक्तीचे प्रतीक आहे. त्या उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांच्यासोबत मी काम केले आहे. प्रिय पल्लवी, तुमच्या पाठिंब्याबद्दल तुझे आभार. तुझ्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव होता. भारतीय सैन्याबद्दल तुमची समज हृदयाला भिडणारी आहे. जय हिंद.”
जॅकी श्रॉफ यांची खास भूमिका
काही दिवसापूर्वी अनुपम खेर यांनी जॅकी श्रॉफ यांच्या भूमिकेबद्दल सांगितले होते. ते या चित्रपटात सैन्यातील ब्रिगेडियर जोशी यांची भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरसाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. तन्वी द ग्रेट हा सिनेमा कधी रिलीज होणार नाही हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
हेही वाचा:
“है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया”; अखेर बिग बींनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सोडले मौन





