Pune : पालख्या आज मार्गस्थ; संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी
Updated On:

पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जयघोष करीत उत्साहपूर्ण वातावरणात भाविकांनी विठूनामाचा गजर करीत पालख्यांमधील पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामासाठी विसावली असताना शनिवारी शहर तसेच उपनगरांतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती.
दोन्ही पालखी सोहळे शहरात मुक्कामी असल्याने संपूर्ण भक्तीमय वातारवण तयार झाले आहे. शहरात विविध ठिकाणी वारकरी, दिंड्या मुक्कामी असल्याने टाळ, मृदंगाचे सूर घुमत होते, रात्री उशीरापर्यंत भजनसेवा सुरू होती.





