पालघरकरांची भूतदया! लॉकडाऊनमध्ये श्रमजीवी संघटनेकडून प्राण्यांना ही दिलासा

पालघर- कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विलगीकरण म्हत्वाचे असल्याने शासनाने लोकडाऊन व संचार बंदी लागू केली. अचानक सगळे बंद झाल्याने अनेक गरीब गरजू लोकांना जगण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याचा विचार करून श्रमजीवी संघटना पुढे येऊन अनेक आदिवासी तसेच गरजू लोकांना धान्य देऊन त्यांची सध्याची गरज भागविण्याचे काम करत आहे.
आपल्या पर्यावरणाचा महत्वाचा घटक म्हणजे प्राणी, या लोकडाऊन मधे कुठे हि खाणे व पाण्याची सुविधा नसल्या कारणाने आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांनाही उपसमारी मुळे प्राणाला मुकावे लागत आहे. यामागील संवेदना जपत श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते पालघर मनोर रस्त्यातील वाघोबा खिडीतील इतक्या दिवसापासून
च्या उपाशी माकडांना 30 डझन केळी,25 किलो टमाटर,दोन किलो भाजके चणे घेऊन त्यांना खायला दिले. हा रस्ता रहदारीचा असल्या कारणाने येथे येणारा प्रवाशी ह्या माकडांना खाद्य वाटप करत असतो परंतु लोकडाऊन च्या काळात ही माकडे उपसमारीमुळे मृत्यू मुखी पडू नये यासाठी श्रमजीवी संघटनेचे पालघर तालुका अध्यक्ष दिनेश पवार,दिपेश बाबर,नेल्सन सेल्वराज, गोविंद महतो,राजु बागल या कार्यकत्यानी माकडांना खायला देऊन प्राणी मात्रावर दया व पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम केले आहे.





