भारताने स्वीकारला पाकचा प्रस्ताव; गौरव अहलुवालिया व कुलभूषण जाधवांची भेट

नवी दिल्ली – भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने रविवारी दिला होता. हा प्रस्ताव भारताने स्वीकारला असून, पाकिस्तानातील भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया हे जाधव यांची भेट घेतली आहे. गौरव अहलुवालिया आणि कुलभूषण जाधव यांच्यात बैठक सुरू झाली आहे.
Pakistan: The meeting between India’s Deputy High Commissioner to Pakistan, Gaurav Ahluwalia and #KulbhushanJadhav begins. pic.twitter.com/nSqHGFF0nO
— ANI (@ANI) September 2, 2019
दरम्यान, भारतीय निवृत्त नौदलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अटकेची माहिती लवकर न देता तसेच त्यांना त्यांच्या देशाच्या वकिलातीसोबत बोलणे न करू देणे हा पाकिस्तानने जिन्हेव्हा कराराचा भंग केला आहे. असा निर्णय संयुक्त राष्ट्राच्या दि हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. पाकिस्तानने जाधव यांना त्यांच्या वकिलातीसोबत चर्चा करू द्यावी तसेच त्यांना दिलेल्या शिक्षेचा परिणामकारक फेरविचार करावा असेही न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार पाकिस्तानने आपण केलेल्या चुकीचे परिमार्जन करण्याच्या हेतूने आता कुलभूषण जाधव यांना आज दुतावासासोबत भेटण्याची परवानगी दिली आहे.





