Pakistani Cricketer Died : धक्कादायक! पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूचा खेळताना मृत्यू; समोर आले ‘हे’ मोठे कारण

Pakistani origin Cricketer Died due to Extreme Heat : क्रिकेटच्या मैदानावर अनेक वेळा वेदनादायक घटना घडतात. जिथे क्रिकेटपटू किंवा पंचाला जीव गमवावा लागतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत, जेव्हा मैदानावर काहीतरी अनुचित घडले आहे. आता पाकिस्तानी वंशाच्या एका क्रिकेटपटूसोबतही असेच काहीसे घडले आहे. जिथे एका खेळाडूचा मैदानावर वेदनादायक मृत्यू झाला. त्या खेळाडूचे नाव जुनैद जफर खान असून त्याच्या मृत्यू ऑस्ट्रेलियातील अति उष्णतेमुळे झाला आहे.
ऑस्ट्रेलियातील धोकादायक उष्णतेचा खेळाडू ठरला बळी –
ऑस्ट्रेलियातील अॅडलेडमध्ये एका पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्याला क्रिकेटच्या मैदानावर आपले प्राण गमवावे लागले. पाकिस्तानी वंशाच्या जुनैद जफर खान नावाच्या खेळाडूला अति उष्णतेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबात आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
ही घटना कधी घडली?
A cricketing match played under extreme heat, between the Old Concordians and Prince Alfred Old Collegians, has ended in disaster.
A player, aged in his 40's, dying on the field – close friends and former team mates left stunned by the sudden death. #9News pic.twitter.com/4VrLbdHk1K
— 9News Adelaide (@9NewsAdel) March 16, 2025
प्रत्यक्षात ही घटना शनिवारी घडल्याचे सांगितले जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुनैद जफर खान ऑस्ट्रेलियातील अॅडलेडमध्ये क्लब क्रिकेट सामना खेळत होता. अॅडलेडमधील कॉनकॉर्डिया कॉलेजमध्ये ओल्ड कॉनकॉर्डियन्स क्रिकेट क्लबकडून खेळणाऱ्या जुनैद जफर खानने प्रथम त्याच्या प्रतिस्पर्ध्या प्रिन्स अल्फ्रेड ओल्ड कॉलेजियन्सविरुद्ध ४० षटके क्षेत्ररक्षण केले. यानंतर, तो फलंदाजी करताना १६ धावांवर नाबाद राहिला. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास तो अचानक जमिनीवर खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूचा कसा झाला मृत्यू –
Deeply saddened by the tragic passing of young Pakistani-Australian Junaid Zafar Khan while playing cricket. May Allah SWT rest him in eternal peace and give strength to his family in this difficult time. Indeed, to Allah SWT we belong, and to Him we all shall return. pic.twitter.com/84o0zxXU30
— Zahid Hafeez Chaudhri (@Zhchaudhri) March 16, 2025
या घटनेनंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि त्यानंतर जुनैद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. न्यूज डॉट कॉम एयूच्या वृत्तानुसार, जुनैद खान २०१३ मध्ये पाकिस्तानहून ऑस्ट्रेलियाला गेला. जिथे त्याने अॅडलेडमधील टेक इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत जुनैद खान रोजा (उपवास) ठेवत होता. त्यामुळे त्याने दिवसाच्या उजेडात पाणी प्यायले नव्हते. आणि त्याला ४१.७ अंश सेल्सिअस तापमान सहन झाले नाही आणि त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा – IPL 2025 Captains Salary : कोण आहे IPL 2025 चा सर्वात स्वस्त कर्णधार? आतापर्यंत दोन संघाची सांभाळलीय धुरा
ओल्ड कॉलेजियन्सनी दुःख व्यक्त करणारे एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये म्हटले की, “ओल्ड कॉनकॉर्डियन्स क्रिकेट क्लबच्या एका मौल्यवान सदस्याच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे, ज्याचा आज कॉनकॉर्डिया कॉलेज ओव्हल येथे खेळताना दुःखदपणे मृत्यू झाला. पॅरामेडिक्सच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, तो दुर्दैवाने वाचला नाही. या कठीण काळात आमच्या संवेदना त्याच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि संघातील सहकाऱ्यांसोबत आहेत.”



