पाकिस्तानी क्रिकेटर सोनाली बेंद्रेच्या प्रेमात झाला होता वेडा होता; म्हणाला,’तू नकार दिलास तर …’

Sonali Bendre । अभिनेत्री सोनाली बेंद्रे फक्त ९० च्या दशकातच नाही तर आजही तिच्या सुंदर हास्याने लोकांना वेड लावते. अभिनेत्री पुन्हा एकदा जुन्या किस्सामुळे चर्चेत आहे. हा किस्सा पाकिस्तानी क्रिकेटरशी संबंधित आहे. पाकिस्तानी टीमचा एक क्रिकेटर या अभिनेत्रीवर इतका एक तर्फी प्रेम करायला लागला होता की, तो तिचे अपहरण करणार असल्याची उघडपणे चर्चा करत होता.
नुकतीच सोनाली बेंद्रे शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये दिसली होती. जिथे अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. यावेळी सोनालीच्या चाहत्यांच्या यादीत पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरचेही नाव घेतले.
शोएब अख्तरने एकदा उघडपणे तिच्यावर प्रेम व्यक्त केले होते. सोनाली बेंद्रेने त्याचा प्रस्ताव नाकारला तर तो तिचे अपहरण करेल, असे या क्रिकेटरने गंमतीत म्हटले होते. पॉडकास्टमध्ये सोनालीकडे जेव्हा ही बाब आली तेव्हा ती खूप लाजली आणि म्हणाली की तिला याबद्दल काहीही माहिती नाही. सोनाली म्हणाली, ‘हे कितपत खरे आहे हे मला माहीत नाही. पण शोएबने असे म्हटले आहे, त्यामुळे त्याच्यासाठी देवाचे आभार, हेच त्याच्या करिअरचे कारण आहे.’
सोनाली बेंद्रेबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने 1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘आग’ चित्रपटाद्वारे चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तिने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले. सोनाली बेंद्रेने तिच्या करिअरमध्ये आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खानसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. सध्या ही अभिनेत्री ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘इंडियन आयडॉल 4’ या रिॲलिटी शोजला जज करताना दिसत आहे.





