Kranti Gaud Troll : “लड़का खेल रहा है… लड़का!”; क्रांती गौडवर शेरेबाजी करणाऱ्या पाकिस्तानी चाहत्यांना टीम इंडियाच चोख प्रत्युत्तर
Kranti Gaud Troll : भारताची युवा वेगवान गोलंदाज क्रांती गौड हिच्यावर स्टँड्समध्ये उपस्थित पाकिस्तानी प्रेक्षकांनी लज्जास्पद शेरेबाजी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Pakistani Fans Troll Kranti Gaud In Womens Asia Cup 2026 India Beat Pakistan 7 Wickets : महिला आशिया चषक २०२६ (Womens Asia Cup 2026) मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान मैदानाबाहेर पाकिस्तानी प्रेक्षकांची संतापजनक आणि अत्यंत खालच्या पातळीची वर्तणूक समोर आली आहे. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेली भारताची युवा वेगवान गोलंदाज क्रांती गौड (Kranti Gaur) हिच्यावर स्टँड्समध्ये उपस्थित पाकिस्तानी प्रेक्षकांनी लज्जास्पद शेरेबाजी केली. मात्र, कोणत्याही वादात न पडता भारतीय महिला संघाने पाकिस्तानला अवघ्या ५५ धावांवर लोळवत ७ गडी राखून दारुण पराभव केला आणि या विकृत ट्रोल्सची तोंडे कायमची बंद केली.
“ओए लड़के, इधर आ!””; पाकिस्तानी चाहत्यांची क्रांतीवर शेरेबाजी!
सामना सुरू असताना क्रांती गौड बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होती. त्यावेळी तिच्या खेळाकडे दुर्लक्ष करून तिच्या शारीरिक रूपावर पाकिस्तानी प्रेक्षक अत्यंत खालच्या भाषेत शेरेबाजी करू लागले. “लड़का खेल रहा है… लड़का! ओए लड़के, इधर आ!” असे ओरडून तिचे लक्ष विचलित करण्याचा आणि तिला ट्रोल करण्याचा हीन प्रयत्न काही प्रेक्षकांनी केला. मात्र, क्रांतीने या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत संयम राखला आणि संपूर्ण लक्ष सामन्यावर केंद्रित केले.
“𝗟𝗮𝗱𝗸𝗮 𝗸𝗵𝗲𝗹 𝗿𝗮𝗵𝗮 𝗵𝗮𝗶… 𝗹𝗮𝗱𝗸𝗮. 𝗢𝘆𝗲 𝗹𝗮𝗱𝗸𝗲, 𝗶𝗱𝗵𝗮𝗿 𝗮𝗮!” — Pakistani fans 😭
Pakistani fans kept trolling Kranti Gaud by calling her “BOY” during the India Women vs Pakistan Women match.
Meanwhile, their own team got bowled out for just 55 runs.… pic.twitter.com/QxyRGdmzJc
— Mukku (@Cric_Mukku) September 6, 2026
पाकिस्तानी संघाचा उडाला धुव्वा; अवघ्या ५५ धावांत संपूर्ण संघ गारद –
मैदानाबाहेर विकृत शेरेबाजी करणाऱ्या पाकिस्तानी प्रेक्षकांचा हा माज जास्त वेळ टिकला नाही. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांसमोर पुरती दाणादाण उडाली. ज्या भारतीय खेळाडूंची खिल्ली उडवली जात होती, त्याच संघाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा अवघ्या ५५ धावांवर खुर्दा पाडला. आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील पाकिस्तानची ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली.
भारताचा ७ विकेट्सने दणदणीत विजय; ट्रोल्सना मैदानातून सडेतोड उत्तर –
Innings Break!
An outstanding bowling performance from #TeamIndia! 🙌 🙌
3️⃣ wickets each for Sree Charani & Prema Rawat
2️⃣ wickets for Deepti Sharma
1️⃣ wicket for Shafali VermaStay tuned for India’s chase! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/1WHHWPMe2o#WomensAsiaCup pic.twitter.com/e27WuNsSL0
— BCCI Women (@BCCIWomen) September 5, 2026
अवघ्या ५६ धावांचे लक्ष्य भारतीय महिला संघाने अवघ्या ८.४ षटकांत ३ गडी गमावून सहज गाठले. भारताच्या या एकतर्फी आणि ऐतिहासिक विजयाने स्टँड्समध्ये बसून शेरेबाजी करणाऱ्या पाकिस्तानी प्रेक्षकांना चांगलेच तोंडघशी पाडले. शेवटी स्वतःच्याच संघाची जगभरात नाचक्की झाल्याने भारतीय गोलंदाजाला हिणवणाऱ्या ट्रोल्सवर हा पराभव चांगलाच भारी पडला.





