#CWC19 : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

लंडन – पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताकडून सपाटून मार खाल्यानंतर पाकिस्तान संघ हा कडवट टीकेचा धनी झाला आहे. उर्वरित प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना आज दक्षिण आफ्रिकेशी लढत द्यावी लागणार आहे. स्पर्धेतील बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी पाकिस्तानप्रमाणेच आफ्रिकेलाही हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. साहजिकच हा सामना चुरशीने खेळला जाईल अशी अपेक्षा आहे.
विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान-द.आफ्रिका याच्यांतील या सामन्यास लॉर्डस मैदानावर थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तान संघाच्या बाजूने लागला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Pakistan opt to bat first at Lord's!
Follow #PAKvSA on our app!
APPLE 🍎 https://t.co/whJQyCahHr
ANDROID 🤖 https://t.co/Lsp1fBwBKR#ProteaFire | #CWC19 | #WeHaveWeWill pic.twitter.com/0bHtPrdhFS— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 23, 2019





