कर्तारपूर कॉरिडॉर सोमवारपासून सुरू करण्याचा पाकचा प्रस्ताव
Updated On:

इस्लामाबाद – शीख भाविकांसाठी महत्त्वाचा असणारा कर्तारपूर कॉरिडॉर येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने भारतापुढे ठेवला आहे. शीख गुरू महाराजा रणजितसिंग यांची सोमवारी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने पाकने हा निर्णय घेतला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर 16 मार्चपासून हा कॉरिडॉर बंद होता. जगात सर्वच ठिकाणी धार्मिक स्थळे खुली केली जात असल्याने हा कॉरिडॉरही आता सुरू करण्याची आमची तयारी आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
हा कॉरिडॉर सुरू करण्यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्चित करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा करावी, असेही पाकने म्हटले आहे. गुरूदासपूरमधील डेराबाबा साहिब आणि पाकिस्तानातील कर्तापरपूर साहिब याला जोडणारा हा कॉरिडॉर गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे.





