PCB : पाक क्रिकेटमध्ये Retirement ची हॅटट्रिक, आमिर इमादनंतर आता ‘या’ वेगवान गोलंदाजानं क्रिकेटला केला अलविदा..

Mohammad Irfan Announces Retirement :- टी-20 विश्वकरंडक 2024 मध्ये पाकिस्तानकडून खेळलेले इमाद वसीम आणि मोहम्मद आमिर गेल्या दोन दिवसांत निवृत्त झाले आहेत. आता पाकिस्तानचा अजून एक वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानही निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.
Towering at 7 feet, pacer Mohammad Irfan bids farewell to international cricket, marking the end of a remarkable journey. pic.twitter.com/HDa0Ij6ppG
— Economy.pk (@pk_economy) December 15, 2024
गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानच्या या 3 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इरफानची उंची क्रिकेटविश्वात नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. त्याची उंची 7 फुटांपेक्षा जास्त होती. याशिवाय त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे.
इरफानने निवृत्ती जाहीर करताना म्हटले, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला माझ्या सहकाऱ्यांचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानायचे आहेत. तुम्ही दिलेले प्रेम, पाठिंबा आणि अविस्मरणीय आठवणींसाठी धन्यवाद. ज्या खेळाने मला सर्व काही दिले त्याला मी पाठिंबा देत राहीन आणि त्याचा आनंद घेत राहीन.
IND vs AUS 3rd Test | जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, कपिल देवचा महान विक्रम काढला मोडित….
इरफानची कारकिर्द…
मोहम्मद इरफानने 2019 मध्ये पाकिस्तानी संघाकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. गेल्या पाच वर्षांपासून तो संघाबाहेर आहे. 2010 मध्ये, त्याने पाकिस्तानी संघासाठी भारताविरुद्ध पदार्पण केले आणि नंतर संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले. त्याने 4 कसोटीत 10 विकेट्स, 60 एकदिवसीय सामन्यांमध्ये 83 विकेट आणि 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 16 विकेट घेतले.





