‘अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी…’; काश्मीरच्या मुद्द्यावरून पुन्हा पाकने ओकली गरळ

Pakistan on Kashmir। पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीर मुद्द्यावरून पाकने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. पाकिस्तानने “काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेसह कोणत्याही देशाची मदत घेण्यास तयार” असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनीहे विधान केले आहे.
पत्रकार परिषदेत शफकत अली खान यांनी बोलताना,”पाकिस्तान केवळ अमेरिकेकडूनच नव्हे तर काश्मीर वाद सोडवण्यास आणि परिस्थिती स्थिर करण्यास मदत करू शकणाऱ्या कोणत्याही देशाकडून मदतीचे स्वागत करेल.” असे म्हटले आहे. ते म्हणाले की,”हा वाद दक्षिण आशियातील शांतता आणि सुरक्षा समस्यांच्या केंद्रस्थानी आहे.”
भारताची भूमिका स्पष्ट, तृतीय पक्षाची मध्यस्थी नाकारली Pakistan on Kashmir।
भारत सतत म्हणत आहे की त्याला पाकिस्तानसोबतच्या चर्चेत कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा सहभाग नको आहे. १९७२ च्या शिमला कराराने दोन्ही देशांमधील कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीलाही नकार दिला. भारताने हे देखील स्पष्ट केले आहे की ते फक्त पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत करण्याच्या आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानशी चर्चा करेल.
मे महिन्याच्या संघर्षानंतर कोणताही संपर्क नाही
मे महिन्यात दोन्ही देशांमधील चार दिवसांच्या संघर्षानंतर कोणत्याही प्रकारचा परस्पर संपर्क झालेला नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी अमेरिकेच्या स्वारस्याचे पाकिस्तान स्वागत करतो असे खान म्हणाले, परंतु भारताने आपले मत बनवावे. सध्या दोन्ही बाजूंमध्ये नियमित राजनैतिक संपर्काशिवाय कोणताही संवाद नाही.
दहशतवाद, अफवा आणि आरोपांना दिले उत्तर Pakistan on Kashmir।
पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील दहशतवादावर बोलताना खान म्हणाले की अफगाणिस्तानातून पसरणाऱ्या दहशतवादाचा मुद्दा अनेक वेळा उपस्थित करण्यात आला आहे. खनिज उत्खननासाठी अमेरिकेसोबत कोणत्याही गुप्त कराराचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले आणि युक्रेन संघर्षात पाकिस्तानी नागरिकांचा सहभाग असल्याचे आरोप “निराधार” असल्याचे म्हटले. खान म्हणाले की युक्रेनियन अधिकाऱ्यांनी या विषयावर पाकिस्तानशी औपचारिकपणे संपर्क साधलेला नाही.





