इराण-इस्रायल युद्धात पाक पंतप्रधानांची उडी ; म्हणाले,”विनाकारण..”

Pakistan on Iran-Israel war। शुक्रवारी सकाळी इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला. यानंतर इराण आणि इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) नेही इराणी लष्कराच्या वरिष्ठ कमांडरना ठार मारल्याचा दावा केला आहे. इस्रायल आणि इराणमधील युद्धात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही उडी घेतली. त्यांनी इस्रायलवर टीका केली आणि म्हटले की,” हे चुकीचे आहे”. शाहबाजने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनीसोशल मीडियावर एक पोस्ट करत, “मी इराणवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात झालेल्या मृत्युंबद्दल मी इराणी जनतेप्रती माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. हे एक अतिशय बेजबाबदार आणि चिंताजनक कृत्य आहे. आधीच अस्थिर असलेल्या प्रदेशात आणखी अस्थिरतेचा धोका आहे. जागतिक शांतता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृती थांबवण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रांना त्वरित कारवाई करण्याचे आवाहन करतो.”असे म्हटले.
इस्रायल डिफेन्स फोर्सने कसा प्रतिसाद दिला? Pakistan on Iran-Israel war।
आयडीएफने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर, “आम्ही आता पुष्टी करू शकतो की इराणी सशस्त्र दलांचे प्रमुख, आयआरजीसीचे कमांडर आणि इराणच्या आपत्कालीन कमांडचे कमांडर हे सर्व इराणमध्ये २०० हून अधिक लढाऊ विमानांनी केलेल्या इस्रायली हल्ल्यात मारले गेले.” असे म्हटले. तसेच आयडीएफने म्हटले आहे की, “त्यांना मिळालेल्या अलिकडच्या गुप्तचर माहितीवरून असे दिसून आले आहे की इराण अण्वस्त्रे विकसित करण्याच्या शर्यतीत परत येण्याच्या मार्गावर आहे.”
इराणने इस्रायलवर आणखी १०० ड्रोन डागले Pakistan on Iran-Israel war।
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने गेल्या काही तासांत इस्रायलवर १०० हून अधिक ड्रोन डागून प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) चे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी याची पुष्टी केली आहे. एफी डेफ्रिनच्या मते, आयडीएफ ड्रोन पाडण्याचे काम करत आहे.





