Pakistan News : धक्कादायक ! पाकिस्तानमधील सिंध प्रातांतून 14 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण
पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात १४ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण (Pakistan News) करण्यात आले आहे.

Pakistan News : पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात १४ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण (Pakistan News) करण्यात आले आहे. आपली १४ वर्षाची मुलगी बेपत्ता झाली असून अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून तिला सुखरुप घरी परत आणावे, असे आवाहन या मुलीच्या पालकांनी व्हिडीओ संदेशाद्वारे प्रशासनाला केले आहे. ही मुलगी बुधवारपासून बेपत्ता आहे.
दिनांक २९ ऑगस्ट रोजी १४ आणि १६ वर्षे वयाच्या दोन बहिणींचे अपहरण (Pakistan News) आणि सक्तीचे धर्मांतर झाले होते. सिंध प्रांतातील कराचीच्या ईशान्येला सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या टंडो अल्लाहयारमधील इब्राहिम कॉलनीतून दोन बहिणींचे अपहरण करण्यात आले होते. नंतर पोलिसांनी त्या बहिणींची सुटका केली आणि त्यांना टंडो अल्लाहयार येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
दिनांक ९ सप्टेंबर रोजी या बहिणींनी घरी परतण्याची परवानगी मागितली. दोन मुस्लिम पुरुषांनी त्यांचे अपहरण केले आणि त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले आणि त्यांच्याशी लग्न केले, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते.
मात्र, खटला प्रलंबित असल्याने, त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याऐवजी (Pakistan News) महिलांच्या सुरक्षित घरात पाठवण्यात आले. त्या प्रकरणामुळे व्यापक जनक्षोभ निर्माण झाला असतानाच, आणखी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता होण्याची घटना घडली आहे.






