ICC । भारताच्या अक्षर पटेलला मागे टाकत पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू बनला ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’

ICC – यंदाच्या वर्षांमध्ये दमदार लयीत असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर आणखी एका कामगिरी नोंद झाली. आयसीसीकडून रिझवानची सप्टेंबर महिन्यातील कामगिरीसाठी ‘आयसीसी ( ICC ) मेन्स प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून निवड करण्यात आली आहे. रिझवानने भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे. या शर्यतीत अक्षर पटेलशिवाय ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनचाही समावेश होता. त्याने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले होते.
सप्टेंबर महिन्यात रिझवानने फलंदाजीत सातत्याने मोठ्या खेळी खेळल्या आहेत. त्यामुळेच आयसीसीच्या ( ICC ) टी-२० क्रमवारीतही मोहम्मद रिझवान पहिल्या क्रमांकावर कायम आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही रिझवानने जबरदस्त फलंदाजी केली होती. सप्टेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या १० सामन्यांमध्ये रिझवानने ७ अर्धशतके ठोकली आहेत. त्याने आशिया कपमध्ये हाँगकाँग आणि भारताविरुद्ध ७० हून अधिक धावा केल्या होत्या.
नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या ७ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या ५ सामन्यांमध्ये रिझवानने चार वेळा ६० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने त्या मालिकेत ६३.२०च्या सरासरीने आणि १३८.६०च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक ३१६ धावा केल्या होत्या. मात्र अखेरच्या दोन सामन्यांत इंग्लड संघाने दमदार पुनरागमन करत मालिका ४-३ अशा फरकाने खिशात घातली.
A top T20I batter has become the ICC Men’s Player of the Month for September 2022 🔥
Details 👇
— ICC (@ICC) October 10, 2022
त्याचबरोबर महिला क्रिकेटमध्ये भारताची हरमनप्रीत कौर सप्टेंबर महिन्यातील ‘आयसीसी ( ICC ) वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ’ बनली आहे. महत्वाचं म्हणजे तिच्यासोबत या स्पर्धेत असलेल्या भारताचीच स्मृती मंधाना हिला हरमनप्रीतने मागे टाकत हा पुरस्कार मिळवला आहे. त्याचबरोबर बांगलादेशच्या कर्णधार निगार सुलतान हिचाही यामध्ये समावेश होता.
A dashing captain has won the ICC Women’s Player of the Month for September 2022 🌟
More 👇
— ICC (@ICC) October 10, 2022



