ICC Player of the Month : आयसीसी प्लेयर ऑफ दि मंथ साठी भारताच्या ‘या’ 3 खेळाडूंना मानांकन जाहीर

ICC Player of the Month : आशिया चषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या (ICC Player of the Month) अभिषेक शर्मा व कुलदीप यादव यांना पुरुष गटातून तर गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत मालिकावीर ठरलेल्या स्मृती मानधनाला महिला गटातून आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी (ICC Player of the Month) नामांकन मिळाले आहे.आशिया करंडकामध्ये अभिषेक शर्मा, कुलदीप यादव यांनी प्रभावी कामगिरी केली होती.
सलामीवीर अभिषेक शर्माने आक्रमक शैलीत 7 सामन्यांमध्ये २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 3 अर्धशतकांसह ३१४ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याबरोबरीने फिरकी गोलंदाज कुलदीपने ९.२९ च्या सरासरीने आणि ६.२७ च्या इकॉनॉमी रेटने सर्वाधिक १७ बळी टिपले. या स्पर्धेतील सर्वोत्म कामगिरी करताना त्याने युएईविरुद्ध ७ धावांच्या मोबदल्यात ४ गडी बाद केले.
या दोघांच्या बरोबरीने झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट हा त्याच्या फलंदाजीसाठी या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला तिसरा पुरुष क्रिकेटपटू आहे. त्याने नऊ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५५.२२ च्या सरासरीने आणि १६५.६६ च्या स्ट्राईक रेटने ४९७ धावा केल्या आहेत. भारताची स्टार फलंदाज स्मृति मानधनाला महिला गटात आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले आहे. स्मृतिने सप्टेंबरमध्ये चार एकदिवसीय सामन्यांमध्ये ७७ च्या सरासरीने आणि १३५.६८ च्या स्ट्राईक रेटने ३०८ धावा केल्या आहेत.





