टेरर फंडिंग प्रकरणी पाकचा “ब्लॅकलिस्ट’मध्ये समावेश

मेलबर्न: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या आर्थिक बाबींवर निगराणी ठेवणारी संस्था “फायनान्शियल ऍक्‍शन टास्क फोर्स’ने (एफएटीएफ) पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

एफएटीएफने दहशतवाद्यांचे आर्थिक पोषण आणि मनी लॉंड्रिंग रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. यापूर्वी एफटीएफने पाकिस्तानला “ग्रे’ यादीत टाकले होते. यासंदर्भात माहिती देताना भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, एफटीएफच्या आशियाई प्रशांत समूहाने जागतिक मापदंड पूर्ण न केल्यामुळे पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले. एफएटीएफला मनी लॉंड्रिंग आणि दहशतवाद्यांच्या वित्तपोषणाशी निगडीत 40 मापदंडांपैकी 32 मापदंड पाकिस्तानने पूर्ण केले नसल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे एफएटीएफने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

काळ्या यादीत आल्यानंतर आता पाकिस्तानला जगातून कर्ज मिळवणे आणखी कठीण जाणार आहे. पाकिस्तान टेरर फंडिंगवर आपला कृती आराखडा तयार करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे एफएटीएफने म्हटले. एफएटीएफने पाकिस्तानला ऑक्‍टोबर 2019 पर्यंत आपला कृती आराखडा तयार करण्यास सांगितले होते. निर्धारित वेळेत 10 मुद्‌द्‌यांवर काम करण्यास सहमती देण्यात आली होती. या कृती आराखड्यात जमात उद दावा, फलाही इन्सानियत, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि अफगाण तालिबान सारख्या दहशतवादी संघटनांच्या आर्थिक पुरवठ्यावर लगाम लावण्यासाठी पाऊल उचलणे, यासारख्या गोष्टींचा समावेश होता. मात्र, पाकिस्तानला यातील एकाही मुद्यावर पुर्णपणे काम करता आले नसल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×