Mukul Dev Death: सिनेविश्वावर शोककळा…. प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव काळाच्यापडद्याआड

Mukul Dev Death : सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव याचं निधन झाले आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समताच सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते एका गंभीर आजाराचा सामना करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार मुकुल देव यांच निधन दिल्लीत झाले आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीत एक वेगळी छाप पाडली होती. त्यांनी १९९० मध्ये सिनेसृष्टीत काम करण्यास सुरूवात केली. सुरुवातील त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर हिंदी चित्रपटात विविध सपोर्टिंग रोलमध्ये मुकुल दिसले.
मुकुल यांनी चाइना गेट आणि कयामत सिटी अंडर थ्रेट यांसारख्या चित्रपटामध्ये काम केल आहे. त्यांच्या अचानक एक्सिट चाहत्यांंना चटका लावणारी आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांनी सन अॅाफ सरदारमध्ये साकारलेल्या भूमिकेचे बरचं कौतुक करण्यात आले होते.





