Pakistan Funny Fielding : पाकिस्तानची पुन्हा उडाली खिल्ली! सोपा रनआऊट सोडून अपीलमध्ये गुंतले खेळाडू, VIDEO होतोय व्हायरल
Pakistan Funny Fielding : एका अत्यंत सोप्या रनआऊटच्या (Missed Run Out) संधीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानच्या खेळाडूंनी स्वतःचेच हसे करून घेतले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Pakistan Funny Fielding Missed Run Out Dan Lawrence Video Viral : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात हेडिंग्ले मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर एका अतिशय हास्यास्पद प्रसंगाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले. पाकिस्तानी संघाचा मैदानातील निष्काळजीपणा आणि सुमार क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. एका अत्यंत सोप्या रनआऊटच्या (Missed Run Out) संधीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानच्या खेळाडूंनी स्वतःचेच हसे करून घेतले, ज्याचा पुरेपूर फायदा उठवत इंग्लंडचा फलंदाज डॅन लॉरेन्सने (Dan Lawrence) अर्धशतक झळकावून पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळले.
नेमकं काय घडलं? अपीलच्या नादात विसरले रनआऊट!
हा ड्रामा तेव्हा सुरू झाला जेव्हा डॅन लॉरेन्सने पुढे येऊन फुलटॉस चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला; मात्र चेंडू थेट त्याच्या पॅडला लागला. चेंडू पॅडवर आदळताच संपूर्ण पाकिस्तानी संघ जोरदार एलबीडब्ल्यूच्या अपीलमध्ये मग्न झाला. स्लिपमध्ये उभा असलेला कर्णधार सलमान अली आगा आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान इतके उत्साहात ओरडत होते की, फलंदाज लॉरेन्स क्रीजच्या खूप बाहेर उभा असल्याचे त्यांच्या लक्षातच आले नाही. लॉरेन्सला धोका जाणवताच त्याने मागे वळून क्रीजमध्ये धाव घेतली.
कर्णधाराचा थ्रो थेट रिझवानलाच लागला; पाकिस्तानचा खेळ खंडोबा –
Pakistan fielding never fails to disappoint 🤣#ENGvPAK #ENGvsPAK pic.twitter.com/TofNwLv5ZB
— Akash Singh (@akashmsd_183) August 20, 2026
लॉरेन्स परत क्रीजकडे धावताना पाहून कर्णधार आगाला अचानक स्टंप्स उडवण्याची आठवण झाली. मात्र, त्याने घाईघाईत फेकलेला थ्रो थेट अपील करत उभ्या असलेल्या मोहम्मद रिझवानला जाऊन लागला. यष्टीरक्षक स्वतःच चेंडूच्या आड आल्यामुळे थ्रो स्टंप्सवर लागला नाही आणि लॉरेन्स सुरक्षितपणे क्रीजमध्ये पोहोचला. विशेष म्हणजे, या गोंधळानंतर पाकिस्तानने घेतलेला एलबीडब्ल्यू रिव्ह्यूही (DRS) वाया गेला आणि ते विकेट मिळवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.
जीवनदानानंतर ठोकली फिफ्टी; इंग्लंडकडे १९५ धावांची भक्कम आघाडी!
🏮PAKISTAN LOOKING OVERCONFIDENCE AGAINST ENGLAND 🤯
– players fielding the ball by his foot
– Salman Ali agha ‘s overacting after dropping Harry Brook Catch 🤡
– Mohammad rizwan focusing on appeal instead of run out
– Bowlers leaking runs like this match is unnecessary… pic.twitter.com/3mq3MTKE4J— VK (@Aur_vicky) August 21, 2026
पाकिस्तानची ही मोठी चूक त्यांना अत्यंत महागात पडली. मिळालेल्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेत डॅन लॉरेन्सने शानदार अर्धशतकी खेळी साकारली. पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या १७१ धावांवर गुंडाळल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेर ८ बाद ३६६ धावा कुटत सामन्यात १९५ धावांची भक्कम आघाडी मिळवली असून पाकिस्तानला सामन्यात पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले आहे.





