Salman Agha Statement : सेमीफायनल किंवा फायनलमध्ये भारत समोर आला तर पाकिस्तान काय करणार? सलमान आगाने केलं सगळं स्पष्ट
Salman Agha Statement : भारत आणि पाकिस्तान नॉकआऊट सामन्यात आमनेसामने आल्यावर काय होणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता, ज्यावर पाकिस्तानच्या कर्णधाराने प्रतिक्रिया दिली आहे.

Salman Agha Statement on IND vs PAK Knock out match : टी-२० वर्ल्ड कप २०२६ या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत सुरूवात होणार आहे. टीम इंडियाला आपल्या मोहिमेला यूएसएविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. तत्पूर्वी पाकिस्ताने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आता पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने नॉकआउट सामन्यांबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आले आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध ४-१ असा विजय आणि सराव सामन्यातील दमदार कामगिरीमुळे भारताचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे भारतीय जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशात भारत आणि पाकिस्तान नॉकआऊट सामन्यात आमनेसामने आल्यावर काय होणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता, ज्यावर पाकिस्तानच्या कर्णधाराने प्रतिक्रिया दिली आहे.
नॉकआउटमध्ये भारत समोर आला तर?
कोलंबो येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सलमान आगाला विचारण्यात आले की, जर सेमीफायनल किंवा फायनलमध्ये भारताशी सामना झाला तर पाकिस्तानची भूमिका काय असेल? यावर तो म्हणाला, “आमच्या सरकारचा जो निर्णय असेल, आम्ही त्याचा आदर करू. जर नॉकआउटमध्ये भारताशी भिडण्याची वेळ आली, तर आम्ही पुन्हा एकदा सरकारकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊ आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करू.” आगाच्या या विधानावरून नॉकआउट सामन्यांबाबतही सस्पेन्स कायम असल्याचे दिसून येत आहे.
Salman Ali Agha further added “We follow whatever our government and chairman says.”
.
.
.
.
.#Cricket #SalmanAgha #INDvsPAK #T20WorldCup2026 pic.twitter.com/qsKsCiGTK7— OneCricket (@OneCricketApp) February 2, 2026
“बांगलादेश आमचा भाऊ, त्यांना बाहेर पाहणं दुःखद”
भारतावरील बहिष्काराबद्दल सलमान आगाची प्रतिक्रिया
आयसीसीने बांगलादेशला वर्ल्ड कपमधून बाहेर काढल्याबद्दलही आगाने नाराजी व्यक्त केली. “बांगलादेशचे खेळाडू आमच्या भावासारखे आहेत. त्यांना या परिस्थितीत पाहणे खरोखरच दुःखद आहे. ते स्पर्धेत आमचे समर्थन करू शकले असते,” असे भावूक उद्गार त्याने यावेळी काढले.
नव्या जोमाने मैदानात उतरणार –
गेल्या वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेविरुद्ध झालेल्या पराभवाचा उल्लेख करत सलमान आगा म्हणाला की, ती आता जुनी गोष्ट झाली आहे. “हे नवे वर्ष आणि नवा वर्ल्ड कप आहे. कर्णधार म्हणून ही माझी पहिलीच मोठी स्पर्धा आहे आणि मी संघाचे नेतृत्व करण्यासाठी खूप उत्साही आहे. प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करावी, असे वातावरण मला संघात निर्माण करायचे आहे,” असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला.





