12 देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना इस्लामाबादला घेऊन जातानाच बसमध्ये स्फोट ; जाणून घ्या कशी आहे परिस्थिती?

Pakistan Bomb Blast । पाकिस्तानमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. दहशतवादासाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या शाहबाजच्या देशाचा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान झाला आहे. 12 देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना इस्लामाबादला घेऊन जाणाऱ्या बसजवळ मोठा स्फोट झाला. मुत्सद्दींना घेऊन जाणाऱ्या बसच्या मागे सुरक्षेसाठी मोठा पोलीस फौजफाटा आणि लष्कर तैनात करण्यात आले होते, मात्र त्यानंतर ताफ्यातील बसमध्ये स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व राजनयिक सुरक्षित आहेत.
हल्ला कुठे झाला ? Pakistan Bomb Blast ।
पाकिस्तानच्या अशांत वायव्य-पश्चिम खैबर पख्तूनख्वा प्रांतात रविवारी परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या स्फोटात एका पोलिसाचा मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा स्फोट रिमोटद्वारे करण्यात आला असून हा काफिला इस्लामाबादहून स्वात जिल्ह्यातील सुंदर डोंगराळ भाग असलेल्या मालम जब्बाकडे जात होता. सर्व मुत्सद्दी सुरक्षित असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या ताफ्यात रशिया, व्हिएतनाम, बोस्निया आणि हर्जेगोविना, इथिओपिया, रवांडा, झिम्बाब्वे, इंडोनेशिया, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान आणि पोर्तुगाल या देशांतील मुत्सद्दींचा समावेश होता.
सर्व मुत्सद्दी सुरक्षित Pakistan Bomb Blast ।
पोलीस अधिकारी म्हणाले, ‘सर्व राजनयिक पूर्णपणे सुरक्षित आहेत. सुरक्षा कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांच्या ताफ्याला स्फोटक यंत्राने लक्ष्य करण्यात आले. तीन जखमी पोलिसांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान अन् राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर राष्ट्रपती आसिफ अली झरदारी म्हणाले – दहशतवादी घटक केवळ देश आणि राष्ट्राचे शत्रू नाहीत तर ते मानवतेचेही शत्रू आहेत. तेहरीक-ए-तालिबान (TTP) आणि शाहबाद सरकार पाकिस्तानमध्ये आमनेसामने आहेत. टीटीपी सातत्याने लष्कर, पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहे. मागच्या महिन्यातच स्वातमधील बाणेर पोलीस ठाण्यावर हल्ला झाला होता, त्यात एक पोलीस शहीद झाला होता.





