पाकिस्तान हादरला ! पेशावरमधील एफसी मुख्यालयावर हल्ला ; परिसरात दोन स्फोट

Pakistan Bomb Blast। पाकिस्तानातील पेशावरमधील फेडरल कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर आज सकाळी बंदूकधारींनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गोळीबाराचा आवाज ऐकू येताच, पोलिस आणि सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराला वेढा घातला. पेशावरमधील अनेक रहिवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “त्यांना एफसी मुख्यालयातून बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज ऐकू आला” असे म्हटले. दरम्यान, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून घटनेचा तपास सुरू आहे.
एका पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीनुसार, पेशावरमधील फेडरल कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर सोमवारी सकाळी ८:१० वाजता हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर, सुनहेरी मस्जिद रोड बंद करण्यात आला आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यादरम्यान दोन स्फोट झाले आणि हल्लेखोरांनी गोळीबार केला, ज्यामुळे दहशत निर्माण झाली. Pakistan Bomb Blast।
Reports indicate a major attack is underway on Pakistani forces at the FC Headquarters in Peshawar, Khyber Pakhtunkhwa. Two loud explosions have been heard, and heavy gunfire is ongoing. A suicide bombing is suspected, though details are still emerging. Information on casualties… pic.twitter.com/9vOWMkrhkI
— Raj anand (@Rajanand7654) November 24, 2025
पोलिस आणि सुरक्षा दलांनी ताबडतोब परिसराला वेढा घातला. हल्ल्यात तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, मुख्यालयाच्या गेटवर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले आणि त्यानंतर गोळीबार झाला.
सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनीही ही घटना पाहिल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानातील पेशावर येथील फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) मुख्यालयावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. परिसरात दोन शक्तिशाली स्फोट झाले तेव्हा ही घटना घडली. ऑनलाइन प्रसारित होणाऱ्या अनेक व्हिडिओंमध्ये सतत गोळीबाराचा आवाजही दिसतो. Pakistan Bomb Blast।





