Pakistan Blast In Car। भारताची राजधानी दिल्लीनंतर आता पाकिस्तनामध्ये आज दुपारच्या सुमारास इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर मोठा स्फोट झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये पाच जण ठार झाले असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाले, असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. न्यायालय संकुलाच्या पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या कारमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला आणि आजूबाजूचा परिसर गोंधळला. स्थानिक पोलिसांच्या मते, न्यायालय परिसरात प्रचंड वाहतूक आणि गर्दी असताना हा स्फोट झाला. या स्फोटात अनेक वकील आणि नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आणि प्राथमिक तपास सुरू केला. Pakistan Blast In Car। सुरुवातीच्या वृत्तानुसार, हा स्फोट सिलेंडरच्या स्फोटामुळे झाला. पोलिसांनी सांगितले की सध्या हा सिलेंडरचा स्फोट असल्याचे दिसून येत आहे, परंतु सखोल तपास सुरू आहे. स्फोटाचे कारण आणि संभाव्य निष्काळजीपणा किंवा इतर घटकांचा तपास करण्यासाठी सुरक्षा दल आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. घटनेनंतर न्यायालय संकुल आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व न्यायालयीन कामकाज स्थगित करण्यात आले आहे आणि पोलिसांनी जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. Pakistan Blast In Car।