पाकिस्तानचा दिल्लीवर हल्ल्याचा प्रयत्न; भारतीय लष्कराने पाकड्यांचा डाव लावला उधळून

India vs Pakistan War | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिक वाढला आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. यानंतर रात्री उशिरा भारताने पाकिस्तानमध्ये जोरदार हल्ले चढविले आहेत.
पाकिस्तानचे तीन एअरबेससह इस्लामाबाद, लाहोरवर मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत. याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडण्यात आले.
दिल्लीवरील मोठा हल्ला परतवला
पाकिस्तानने पहाटे ४:००च्या सुमारास डागलेली फतेह २ मिसाईल हरियाणाच्या सिरसाच्या आकाशात पोहोचली होती. ही मिसाईल हरियाणाच्या आकाशात आल्यावर भारतीय सैन्याने एअर डिफेन्सद्वारे पाडली. यामुळे दिल्लीवरील मोठा हल्ला परतवून लावण्यात आला आहे. सिरसामधून अनेक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर येत आहेत. यामध्ये मोठा स्फोटाचा आवाज आणि स्फोटानंतरचा प्रकाश दिसत आहे. India vs Pakistan War |
पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला होता. मात्र काही वेळातच भारतीय लष्कराने पाकला जशास तसं उत्तर दिलं. पाकिस्तानमधील तीन महत्त्वाच्या एअरबेसला टार्गेट करत भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आला आहे. नूर खान, रफिक आणि मुरिद एअरबेस भारताकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. पाकिस्तानमधील रावळपिंडी शहर मध्यरात्री स्फोटांनी हादरल्याची माहिती समोर आली.
शुक्रवारी सायंकाळी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर सीमाभागात ब्लॅकआऊट करण्यात आले होते. तसेच रात्री उशिरा पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या 4 राज्यांमधील 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले. श्रीनगर विमानतळावरही हल्ला झाला आहे. India vs Pakistan War |
हेही वाचा :





