पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात एक भारतीय जवान शहीद

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं असून जम्मू काश्मीरमधील कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा घाटीत पहाटे साडे तीन वाजता तर नौशेरा सेक्टरमध्ये पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्यांना चोख उत्तर देत आहे. दरम्यान गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.
One Indian Army jawan has lost his life in the ceasefire violation by Pakistan Army in the Nowshera sector (J&K) along the Line of Control (LoC). pic.twitter.com/c5LzirX1Wc
— ANI (@ANI) June 22, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पहाटे साडे तीन वाजता अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर राजौरी जिल्ह्यातील नौशेरे सेक्टरमध्ये साडे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली. भारतीय जवान पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर देत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल आनंद यांनी दिली आहे.दरम्यान नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर करण्यात आलेल्या गोळीबारात पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना भारतीय जवान शहीद झाला आहे.





