Pakistan Afghanistan Air Strike : पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सात ठिकाणांवर मध्यरात्री एअर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानने लढाऊ विमानांद्वारे पाकिस्तान-अफगानिस्तान सीमेवर दहशतवादी गटांना लक्ष्य करून हल्ले केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात अफगाणिस्तानमधील 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांनी रविवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती दिली की, सैन्याने ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ आणि त्यांच्या सहयोगी संघटनांच्या सात तळांवर गुप्त माहितीच्या आधारे निवडक ऑपरेशन्स केली आहेत. सीमावर्ती भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित एका गटावरही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, पाकिस्तानने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या हद्दीत ड्युरंड लाईन जवळ अनेक ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला. अफगाणिस्तानचा हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा इशारा याबाबत अफगानिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानचे सरकारी प्रवक्ता जबिहुल्लाह मुजाहिद यांनी ‘एक्स’द्वारे या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “काल रात्री त्यांनी नांगरहार आणि पक्तिका प्रांतांमध्ये आमच्या नागरिकांवर बॉम्ब हल्ले केले, ज्यात महिला आणि मुलांसह डजनभर लोक शहीद आणि जखमी झाले आहेत” असे ते म्हणाले. मात्र अफगाणिस्तानने या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचं म्हटलं आहे. Rohit Pawar ZP Security: रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा द्या, अजितदादांच्या अपघाताबाबत संशय अन्… ‘टोलो न्यूज’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात एका मदरसावर हल्ला केला. याशिवाय पाकिस्तानी लढाऊ विमानांनी नंगरहार प्रांतातील खोगयानी जिल्ह्यातही एअर स्ट्राईक केला. पक्तिकाच्या बरमल आणि अर्गुनसह नंगरहारमधील खोगयानी, बहसोद आणि गनी खेल जिल्ह्यांतही हल्ले करण्यात आले. आत्मघाती हल्ल्यांनंतर पाकिस्तानची कारवाई बाजौर आणि बन्नू जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्यांनंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. या हल्ल्यांमागे अफगाणिस्तानात बसलेल्या टीटीपी नेतृत्वाचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. यात ११ सैनिकांसह एका मुलाचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या हल्ल्यात एका लेफ्टिनेंट कर्नलसह दोन सैनिकांचा मृत्यू झाला होता. टीटीपी पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर करतं, असा आरोप पाकिस्तान अनेकदा करत आहे. हेही वाचा: Cyber Crime : सावधान! हॉटेल बुकिंग बदलण्याच्या नादात महिलेने गमावले ७ लाख; पाहा काय घडलं?