Rohit Pawar ZP Security: रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा द्या, अजितदादांच्या अपघाताबाबत संशय अन्…
Rohit Pawar ZP Security: अजित पवार यांच्या मृत्यूबाबत रोहित पवारांनी घातपाताची शंका उपस्थित केल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त

Rohit Pawar ZP Security: अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केले जात आहेत. याबाबत अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक आरोप केले. रोहित पवारांनी यापूर्वीच VSR कंपनीच्या अनियमितता, ब्लॅक बॉक्सचा संशय आणि आयटी सेलकडून होणारे ट्रोलिंग यावर सविस्तर भाष्य केले आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. खर्डा येथील पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाला निवेदन देत ही मागणी केली आहे.
अजित पवार यांच्या मृत्यूबाबत रोहित पवारांनी घातपाताची घातपाताची शंका उपस्थित केल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू नये, असे काही घटकांना वाटते. अशा लोकांपासून रोहित पवारांना धोका असू शकतो.”
सुनील माने यांनी या प्रकरणात केवळ राजकीय नव्हे, तर व्यावसायिक लोकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः विमान कंपनी (VSR) आणि त्याशी संबंधित असलेल्या मोठ्या आर्थिक हितसंबंधांमुळे रोहित पवारांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा संशय व्यक्त केला जात आहे. Rohit Pawar ZP Security:
देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणत रोहित पवार म्हणाले…
दरम्यान, व्हीएसआर कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान असू शकते आणि डीजीसीएचे मोठे अधिकारीही यामागे आहेत. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीच या तपासात लक्ष दिले पाहिजे, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली होती. Rohit Pawar ZP Security:
हेही वाचा:





