Asia Cup 2025 : धक्कादायक! यूएईविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूने अंपायरला मारला चेंडू, VIDEO व्हायरल

Asia Cup 2025 Pakistani fielder hit Umpire : आशिया कप 2025 चा 10 वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने 41 धावांनी विजय मिळवत सुपर-4 साठी पात्रता मिळवली, तर यूएईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दरम्यान, या सामन्यात एक छोटीशी दुर्घटना घडली, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानी खेळाडूने अंपायरला मारली चेंडू –
पाकिस्तानच्या डावातील सहाव्या षटकात सैम अयूब गोलंदाजी करत असताना, यूएईच्या फलंदाज ध्रुव पराशरने मिडविकेटच्या दिशेने एक फटका खेळला. या फटक्यावर कोणतीही धाव आली नाही. यावेळी पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद हारिसने चेंडू सैम अयूबकडे फेकला, परंतु तो थेट अंपायरच्या डोक्याला लागला.
The umpire who had been giving wrong decisions since the India vs Pak match for Pakistan was hit by a Pakistani fielder and left the ground.
Warra Aatankvadi team😭😭 pic.twitter.com/qVXwHGabuQ— paty (@_midwicket) September 17, 2025
Video 👉 https://t.co/NrR5cUB80P#SaimAyub pic.twitter.com/sp5ztLpDol
— CricketTimes.com (@CricketTimesHQ) September 18, 2025
ही घटना अनावधानाने घडली असली, तरी अंपायरचे लक्ष चेंडूकडे नव्हते. चेंडू लागल्यानंतर खेळाडूंनी तातडीने अंपायरकडे धाव घेत त्यांची विचारपूस केली. फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी अंपायरची तपासणी केली. मात्र, दुखापतीमुळे अंपायरला पुढे पंचगिरी करता आली नाही आणि त्यांना मैदानाबाहेर जावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – Sachin Yadav : कोण आहे सचिन यादव? ज्याने नीरज चोप्रा आणि अरशद नदीमला मागे टाकत पटकावलं चौथं स्थान
पाकिस्तानचा विजय –
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 146 धावांचा डोंगर उभा केला, ज्यामध्ये फखर झमानने सर्वाधिक 50 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात यूएईचा संघ 17.4 षटकांत केवळ 105 धावांवर बाद झाला. पाकिस्तानने हा सामना 41 धावांनी जिंकला. या विजयासह पाकिस्तानने सुपर-4 मध्ये प्रवेश केला असून, आता 21 सप्टेंबर रोजी त्यांचा सामना भारतीय संघाशी होणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या आशिया कपमध्ये भारताने 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानला पराभूत केले होते. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.





