PAK vs BAN 2nd Test : पीसीबीचा मोठा निर्णय..! दुसऱ्या कसोटी सामन्याचे अचानक बदलले ठिकाण, समोर आलं ‘हे’ कारण…

Pakistan vs Bangladesh 2nd Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत होणार आहे. दुसरा सामना कराचीत होणार होता. मात्र आता दुसऱ्या कसोटीचे ठिकाण बदलण्यात आले आहे.
आता दोन्ही सामने रावळपिंडीत होणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. एक्स (X) वर पोस्ट शेअर करताना PCB ने लिहिले आहे की, “दोन्ही कसोटी सामने रावळपिंडीत खेळले जातील.” दरम्यान याचे कारणही समोर आले आहे.
वास्तविक, कराचीतील क्रिकेट स्टेडियमवर लवकरच काम सुरू होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हे स्टेडियम तयार करण्यात येणार आहे. या कारणास्तव दुसरा कसोटी सामना कराचीहून रावळपिंडीला हलवण्यात आला आहे. हा सामना 30 ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे. आता कसोटी मालिकेतील दोन्ही सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. कराचीच्या स्टेडियममध्ये लवकरच नूतनीकरणाचे काम सुरू होणार आहे.
Bank Alfalah Presents Blue World City Pakistan vs Bangladesh Test series 2024 begins on 21 August 🗓️
🏏Both ICC World Test Championship matches to be held at Rawalpindi Cricket Stadium
🎟️Get your tickets at https://t.co/KKKmwpStnB #PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/7S096qYzDN
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 18, 2024
पीसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “कराचीतील स्टेडियममध्ये बांधकामाचे काम सुरू आहे. या कारणास्तव तेथे अनेक अवजड यंत्रे बसविण्यात आली आहेत. हे स्टेडियम 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयार केले जाणार आहे. या कारणास्तव हा कसोटी सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर हलवला जात आहे.”
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या कराची कसोटीत चाहत्यांना ‘नो एंट्री’… समोर आले मोठे कारण
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघ शान मसूदच्या नेतृत्वाखाली ही कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने बाबर आझम, सॅम अयुब आणि सौद शकील यांचाही संघात समावेश केला आहे. बांगलादेश क्रिकेट संघ नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या संघात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनचाही समावेश आहे.





