PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या कराची कसोटीत चाहत्यांना ‘नो एंट्री’… समोर आले मोठे कारण

PAK vs BAN 2nd Test (National Stadium Karachi) : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. 30 ऑगस्टपासून दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पण याच दरम्यान चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कसोटीसाठी स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश मिळणार नाही.
वास्तविक, सध्या नॅशनल स्टेडियम कराचीमध्ये बांधकाम सुरू आहे. त्यामुळे चाहत्यांना स्टेडियममधून कसोटी पाहता येणार नाही. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नॅशनल स्टेडियम कराची येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. वास्तविक, बरेच दिवस आंतरराष्ट्रीय संघ पाकिस्तान दौरा टाळत होते, परंतु आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये परत येत आहेत, त्यातच स्टेडियममध्ये प्रवेश नाही म्हटल्यावर काही चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बांगलादेशपाठोपाठ वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचे संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर भारतासह अनेक संघांनी सुरक्षेच्या कारणास्तव अनेक दिवसांपासून पाकिस्तानला भेट दिली नाही. मात्र, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
वास्तविक, पाकिस्तान सुपर लीग दरम्यान, नॅशनल स्टेडियम कराचीचे स्टँड रिकामे दिसले. क्रिकेटचे चाहते फार कमी संख्येने दिसले. तिकिटाची किंमत पाकिस्तानी चलनात फक्त 50 रुपये असली तरी भारतीय चलनात ही किंमत 15 रुपये आहे, पण तरीही चाहत्यांनी रस दाखवला नाही. मीडिया रिपोर्ट्सवर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भीती होती की चाहते कमी संख्येने स्टेडियममध्ये येतील. असे झाल्यास पाकिस्तान क्रिकेट पुन्हा अडचणीत येईल, त्यामुळे पाकिस्तान-बांगलादेश कसोटीसाठी पीसीबीने चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्यास मनाई केली आहे.





