PAK vs BAN 1st Test (Day 3 Stumps) : बांगलादेशचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, रावळपिंडी कसोटीत केले पुनरागमन…

PAK vs BAN 1st Test (Day 3 Stumps) : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. तिसऱ्या दिवशी बांगलादेशने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. शुक्रवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने पहिल्या डावात 5 गडी गमावून 316 धावा केल्या आहेत. संघाकडून फलंदाजीत सदमान इस्लाम, लिटन दास आणि मुशफिकर रहीम यांनी चमकदार कामगिरी केली. बांगलादेशचा संघ अजूनही पाकिस्तानपेक्षा 132 धावांनी मागे आहे.
Bangladesh 🆚 Pakistan | 1st Test | Day 03
Stumps| Bangladesh trail by 132 runs.
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/7KarwWOOm1— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 23, 2024
बांगलादेशची सुरुवात खराब झाली. 53 धावांवर त्याचे दोन फलंदाज माघारी परतले होते, मात्र यानंतर इस्लाम आणि मोमिनुल हकने डावाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. इस्लामने 183 चेंडूंचा सामना करत 93 धावा केल्या. त्याने 12 चौकार मारले. तर मोमिनुलने 76 चेंडूंचा सामना करत 50 धावा केल्या. या दोघांनी संघाचा डाव सावरला. त्यानंतर संघाची स्थिती 5 बाद 218 अशी असताना मुशफिकुर रहीम आणि लिटन दास यांनी आणखी विकेटची पडझड न होऊ देता आणि 98 धावांची भागीदारी करत संघाचे सामन्यात पुनरागमन केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 5 बाद 316 अशी मजल मारली होती आणि लिटन दास 52 धावा करून तर मुशफिकर रहीम नाबाद 55 धावा करून माघारी परतले.
बांगलादेशच्या डावात तिसऱ्या दिवसापर्यंत पाकिस्तानकडून कुर्रम शहजादने चांगली गोलंदाजी केली. त्याने 19 षटकात 47 धावा देत 2 बळी घेतले. नसीम शाहने 20 षटकात 77 धावा देत 1 बळी घेतला. मोहम्मद अली आणि सॅम अयुबने 1-1 विकेट घेतली. अयुबने 5 षटकात 23 धावा दिल्या.
Unofficial Test : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी रंगतदार स्थितीत, दुसऱ्या दिवशी एकूण 15 गडी बाद….
पाकचा पहिला डाव 448 वर घोषित…
त्यापूर्वी, पाकिस्तानने पहिला डाव 6 बाद 448 धावावर घोषित केला होता. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी शानदार फलंदाजी केली. रिझवानने नाबाद 171 धावा केल्या. 239 चेंडूंचा सामना करताना त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. शकीलने 141 धावांची खेळी केली. त्याने 261 चेंडूंचा सामना करत 9 चौकार मारले. शाहीन आफ्रिदीने नाबाद 29 धावा केल्या. याआधी सॅम अयुबने 56 धावांची खेळी केली होती.





