ट्विटरने अरिफ अल्वींना धाडली नोटीस
इस्लामाबाद: भारताने काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान सातत्याने या ना त्या प्रकारे काश्मीरी जनतेला भडकावण्याचा प्रयत्न करत असून सदर प्रकरणी अक्षेपार्ह ट्विट केल्याने ट्विटरने पाकिस्तानचे राष्ट्रपती अरिफ अल्वींना नोटिस धाडली आहे.
पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री शिरिन मझारी यांनी अल्वीयांना ट्विटरने पाठवलेल्या नोटीसचा स्क्रीन शॉट काढून सोशल मिडीयावर ताकला असून त्याला ही नोटीस म्हणजे हस्यास्पद प्रकार असे कॅप्शन दिले आहे. सोमवारी अल्वीयांनी काश्मीर येथील एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट केला होता. त्यानंतर ट्विटरने ही कारवाई केली आहे. तसेच रविवार पाकिस्तानचे आणखीन एक मंत्री मुराद सईद यांना देखील ट्विटरने नोटीस पाठवली होती असे विधान केले आहे.